Thursday, 6 August 2020

Dream Girl

  स्वप्नात येऊन, माझी  दुनिया रंगवनारी
स्वप्नातली परी सांग केव्हा येशील माझ्या घरी
  वाट पाहतोय मि , असेल कोणीतरी माझी काळजी करणारी
  आई प्रमाणे माझ मन ओळखनारी
   स्वप्नातली परी सांग केव्हा येशील माझ्या घरी

  चातक  पक्षी जसा वाट पाहतोय पहिल्या पाऊसाची
          तशीच वाट पाहतोय तुझ्या आगमनाची
     रोज अशीच माझ्या मनाची हलचल वाढवणारी               
स्वप्नातली परी सांग केव्हा येशील माझ्या घरी

मि  आपलं नातं  दिवा वाती  प्रमाणे जपेल
माझ्या सोबत तुझे स्वप्न देखील पूर्ण करेल
तरी देखील स्वताच्या इच्छा मानात ठेऊन मलाच प्राधान्य देणारी
स्वप्नातली परी सांग केव्हा येशील माझ्या घरी

         तुझ्या सोबतच्या स्वप्नाला आपुलकीचा भास्
         पुन्हा एकदा लागली आहे तुझ्या स्वप्नाची आस
               एवढे सर्व प्रेमळ अनुभव देणारी
          स्वप्नातली परी सांग केव्हा येशील माझ्या घरी

स्वप्नाच्या दुनियेत रोज अशीच माला भेटशील का ?
बनून माझी Dream  Girl माझ्या घरी येशील का ?

Posted  By : pankaj_bhakre

No comments:

Post a Comment